N Rojgar
  • 3.8

N Rojgar

  • Latest Version
  • Nathe Publication

Best for Job Updates, Exam Preparation, Opportunities, Quiz and much more

About this app

N.Rojgar मध्ये खालील भागाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Opportunities :

दररोज केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय, निमशासकीय, महामंडळाच्या जागा निघत असतात. त्या जागांविषयी माहिती येथे देण्यात येते. शासनाच्या निघालेल्या जागा दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर... अशा वर्गवारीनुसार येथे दिल्या जातात. शिवाय ज्या विभागाच्या जागा निघाल्या असतील त्या विभागाची वेबसाईट ‘Visit Link’ मध्ये देण्यात येते. त्यामुळे त्या Link ला Click करताच तुम्ही त्या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हवी ती माहिती मिळवू शकता. आपल्याला रोजगाराची माहिती घरबसल्या मिळावी, या उद्देशाने Opportunities हा भाग सुरू करण्यात आला आहे. खरे तर यासाठीच Paid App तयार करण्यात आले आहे, इतर भाग जसे न्यूज, चालू घडामोडी, विविध विभागाच्या प्रश्नपत्रिका इत्यादी उमेदवारांना Bonus म्हणून देण्यात येते.

वैधानिक टिप्पणी : Opportunities विषयी माहिती काढताना आम्ही सर्वप्रकारची काळजी घेतोच. तरीही उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची मूळ जाहिरात/वेबसाईट तपासून पाहणे गरजेचे आहे. यासंबंधित घडलेल्या कोणत्याही चुकीच्या घटनेला N.Rojgar मालक कंपनी, संपादक वा इतर कोणीही जबाबदार राहणार नाही.

Stress Test :

अलीकडे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपला तणाव आपल्याला घरीच तपासता यावा यासाठी ही Stress Test दिलेली आहे. यात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि प्रामाणिकपणे ही टेस्ट सोडवून पाहायची. अगदी सहज आणि सोपी ही टेस्ट आहे. प्रत्येकाने प्रत्येक आठवड्याला किमान एकदा तरी पुन्हा-पुन्हा ही टेस्ट सोडवून आपला तणाव तपासून पाहणे अपेक्षित आहे.

News :

स्पर्धा परीक्षांना उपयुक्त दैनंदिन महत्त्वाच्या घडामोडी येथे देण्यात येतात. सर्वच प्रकारच्या म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नोकरीविषयी शासनाचे निर्णय इत्यादी सर्वच अपडेट बातम्या येथे दिल्या जातात.

Quiz :

आमच्या प्रत्येक सभासदाला अर्थपूर्ण वाचनाची सवय लागावी म्हणून Quiz सुरू करण्यात आली आहे. ही Quiz 'रोजगार नोकरी संदर्भ’ मध्ये प्रकाशित महत्त्वाच्या बातम्या, समसामायिकी, UPSC/MPSC ची प्रश्नोत्तरे, पोलीस भरती/ जिल्हा परिषद/ तलाठी... इत्यादी घटकांवरील माहितीवर आधारित असते. प्रत्येक आठवड्यात प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन विजेते निवडले जातात. विजेत्यांची नावे रोजगार नोकरी संदर्भमध्ये प्रसिद्ध केली जातात. ही Quiz आपले ज्ञान वाढविण्यास उपयुक्त ठरते.

Exam :

स्पर्धा परीक्षार्थ्‍यांना N.Rojgar मधील सर्वात जास्त आवडलेला आणि हे अॅप डाऊनलोड करायला भाग पडणारा भाग म्हणजे 'Exam’. यामध्ये सध्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका टाकण्यात आल्या आहेत. अगदी चालता फिरता अभ्यास करता येईल अशा पद्धतीने ही प्रश्नोत्तरे सोडविता येतात. महाराष्ट्रात पोलीस भरतीची तयारी करणा:या प्रत्येकच अभ्यासू, जिज्ञासू आणि हुशार उमेदवाराकडे हे अॅप असावे.
स्पर्धा परीक्षेत General Knowledge हा भागही अत्यंत महत्त्वाचा. यामध्ये राज्यघटना व पंचायतराज, आधुनिक भारताचा इतिहास, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असतो. सर्वच स्पर्धा परीक्षांना हा भाग उपयुक्त ठरणारा असल्यामुळे या विषयांचा समावेश प्रस्तुत अॅपमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक आठवड्यात किमान एक प्रश्नपत्रिका तरी नवीन, अपडेटेड आमच्या सभासदाला मिळावी असा आमचा प्रयत्न राहतो. थोडक्यात स्पर्धा परीक्षेद्वारा करियर करण्याची इच्छा असणा-या प्रत्येक विद्यार्थ्‍याला N.Rojgar हे अॅप उपयुक्त ठरेल, अशी याची मांडणी करण्यात आली आहे.
---
Disclaimer

(1) This app does not represent any government or political entity. All the content provided here is only for the educational and informational purposes of the users. Your use of the information provided on this app is solely at your own risk.
(1) We obtain information from the "Rojgar Naukri Sandarbh", as well as from reputable sources and government organizations that are publicly accessible.

Sources of the data:
www.ncs.gov.in
www.joinindiannavy.gov.in
mponline.gov.in
ssc.nic.in
police.assam.gov.in
www.drdo.gov.in
www.indianrailways.gov.in
www.isro.gov.in
www.indianairforce.nic.in
www.upsc.gov.in
uppsc.up.nic.in

Versions N Rojgar